शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडल्यास वीज वितरण कंपनीला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल- शिवा नरंगले


कंधार, प्रतिनिधी
वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे व गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे वीज कनेक्शन तोडल्यास वीज वितरण कंपनीला गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


अनेक अडचणींचा सामना करून शेतकरी आता रब्बी पिकांच्या मशागतीस लागला असताना गहू, हरभरा आदी पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीज वितरण कंपनी कृषीपंपाची विज कापत असून त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.

अतिवृष्टीमुळे व नापिकीमुळे अडचणीत असलेला शेतकरी आता केवळ रब्बीच्या पिकावर अवलंबून आहे. शेतात सध्या गहू , हरभरा या पिकासह काही रब्बी हंगामातील पिके आहेत. ज्यांना पाण्याची पाळी देण्याची आवश्यकता आहे. परंतु वीज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनी सक्तीची वसुली करण्याचा सपाटा सुरू केला आहे.


शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय कापण्यात येत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी आता चिंतातुर पाहायला मिळत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने कृषीपंपाची वीज कापल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी दिला आहे.

कृषीपंपा बरोबरच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे कनेक्शन ही तोडण्यात येत आहे. ज्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने अशा विहिरींचे व कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडल्यास वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलने वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


विनंतीवरून वीज वितरण कंपनीने ही कारवाई न थांबल्यास वीज वितरण कंपनीला गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे.

महासचिव प्रेमानंद गायकवाड, युवा नेते शंकर पाटील घोरबांड’ खंडोजी अकोले’ मोसिम बागवान’ बबन जोंधळे’ प्रविंणसिंह कच्छवा’ सुमित पवार ‘बालाजी सैराते भास्कर कदम विहान पा कदम’ रंजीत कसबे ,अहमद पठाण ‘संभाजी कांबळे’ निखिल सोनसळे’ सूर्यनिकीत’ बालाजी गायकवाड’ यासह अनेक शेतकरी बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *