गऊळ; शंकर तेलंग
कंधार तालुक्यातील कुरुळा येथील गावांमध्ये लसीकरणाचे काम मंद गतीने चालू होतं. गावातील नागरिकांच्या मनामध्ये लसीकरनाबद्दल अनेक संभ्रम होते. ते दुर करून त्याबद्दल सर्व शिक्षक कर्मचारी व इतर कर्मचारी यांनी कुरुळा 100% लसीकरण होण्याचा निर्धार केलेला आहे. आणि ते पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे.कुरूळा येथे शंभर टक्के covid-19 लसीकरण चा निर्धार केला असल्याने लसीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे त्यामुळे कंधारचे गटविकास अधिकारी मांजरमकर यांनी केले टिमचे कौतूक
कुरुळा व कुरूळाअंतर्गत बीट यांचं लसीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. मा. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी राबवलेल्या योजनेबद्दल गटविकास अधिकारी श्री. मांजरमकर साहेबानी या कार्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले.
दिलेल्या शिक्षकाच्या कामाबद्दल आढावा घेऊन बैठकीमध्ये समाधान व्यक्त केले.
श्री मांजरमकर साहेब गट विकास अधिकारी कंधार यांच्या अध्यक्षतेखाली श्री सतीशजी व्यवहारे साहेब(शिक्षण विस्तार अधिकारी कुरुळा बीट) यांनी ही बैठक आयोजित केली होती.
यावेळी बाळासाहेब गोमारे जिल्हा प. सदस्य, श्री शिवदर्शन चीवडे उपसरपंच कुरूळा, श्री ढवळे साहेब तालुका आरोग्य अधिकारी कंधार, डॉ. प्रविण जाधव वैद्यकीय अधिकारी, कांदे साहेब, चव्हाण साहेब, थोटे साहेब (केंद्रप्रमुख), शाळेचे मु.अ श्री सुरेश धोंडगे साहेब, ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई या बैठकीला उपस्थित होते.