नांदेड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षातील आमदारांनी विधानभवन, मुंबई येथे एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी राज्यमंत्री आ. रणजीत कांबळे, आ. संग्राम थोपटे, आ. पी.एन. पाटील, आ. अमित झनक, आ. कुणाल पाटील, आ. कैलास गोरंट्याल, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष आ.डॉ. वजाहत मिर्झा,
आ. माधवराव जवळगावकर, आ.सौ. सुलभाताई खोडके, आ. विक्रमसिंह सावंत, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, आ. मोहन हंबर्डे, आ. धीरज देशमुख, आ.सौ. प्रतिभाताई धानोरकर, आ. जितेश अंतापूरकर आदी उपस्थित होते.