डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण विकास पत्रकारिता पुरस्कार प्रा.डॉ.गंगाधर तोगरे यांना जाहीर

कंधार : प्रतिनिधी

दैनिक लोकमत च्या माध्यमातून ग्रामिण भागातील अनेक विकासात्मक बातम्या मुळे असंख्य नागरीकांना न्याय देणारे जेष्ठ पञकार प्रा.डॉ. गंगाधर तोंगरे यांना स्व. पञकार दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण व हिंदवी बाणा लाईव्हच्या तर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण विकास पत्रकारिता पुरस्कार 2021 नुकताच जाहीर झाला आहे. त्याबदल सर्वच क्षेतातून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्व पञकार दुर्गादास सराफ प्रतिष्ठाण तर्फे 2021चे पुरस्कार कंधार येथे जाहीर झाले आहेत त्यामधे
ऋषी देसाई यांना राज्यस्तरीय तर कालीदास जाहगीरदार यांना मराठवाडास्तरीय पुरस्कार जाहीर आणि दैनिक नांदेड चौफेरचे संपादक पठाण आरेफ खान यांना महात्मा फुले उत्कृष्ठ पत्रकारीता जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील प्रत्येकी एका पत्रकारास पुरस्कार देण्या संदर्भात प्रस्ताव मागवीण्यात आला होतो.यातील एका उत्कृष्ठ पत्रकारास खालील प्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण विकास पत्रकारिता पुरस्कार प्रा.डॉ.गंगाधर तोगरे, लोकमत (कंधार)

कै. माधवराव आंबुलगेकर पत्रकारिता पुरस्कार गौतम लंके लोकमत ,( कासराळी ता. बिलोली ),

कै. दुर्गादास सराफ पत्रकारिता पुरस्कार शिवाजी कोनापुरे प्रजावानी ( मुखेड ) यांना

तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यास कंधार भूषण सामाजिक पुरस्कार विठ्ठल नारायण मुनगीलवार यांना जाहिर झाला आहे. यासह नांदेड जिल्ह्यातिल प्रत्येक तालुक्यातून एका पजकारांना पुरस्कार जाहीर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *