अहमदपूर ( प्रा. भगवान आमलापुरे )

येथून जवळच असलेल्या मौजे किनगाव येथील मल्हारराव होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेत कवी शिवाजी नामपल्ले लिखित आधारवड कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन दि ०३ जाने २२ रोजी करण्यात आले आहे.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ पांडुरंग टोंपे असणार आहेत. ग्रामीण कथाकार तथा सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, विलास सिंदगीकर यांच्या शुभहस्ते आधारवड या कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रसिद्ध गझलकार प्रा डॉ मुकूंद राजपंखे सर नव - प्रकाशित काव्यसंग्रहावर भाष्य करणार आहेत. तर प्राचार्या शोभाताई गुंठे आणि सरपंच किशोर मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सकाळी ठीक ११ : ०० वाजता प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यानंतर प्रा डॉ मुकूंद राजपंखे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीतांचे कविसंमेलन पार पडणार आहे. कवी राजेसाहेब कदम सुत्रसंचालन करणार आहेत.
या कविसंमेलनात बालाजी मुंडे, अनिल चवळे, राजेंद्र कांबळे, सुभाष साबळे, एन डी राठोड, चंद्रकांत मोरे, संग्राम कुमठेकर, अंकुश सिंदगीकर, सतिष नाईकवाडे, मारोती कसाब, ज्ञानेश्वर हांडरगुळीकर, रंजना गायकवाड, संजीवकुमार भोसले, मुरहारी कराड,योगेश ताटे, भगवान आमलापुरे आणि प्रफुल्ल धामणगावकर यांचा सहभाग असणार आहे.


