औरंगाबाद ; प्रतिनिधी
गेली काही वर्षे दुष्काळ कोव्हीड १९ संसर्ग अतिवृष्टी, गारपीट इ. नैसर्गिक आपत्ती मुळे अडचणीत आलेल्या बँकेच्या थकीत कर्जदाराला खाजगी सावकाराकडे जाण्याची वेळ येत आहे. अशा कठीण प्रसंगात बँक अशा खातेदारासोबत उभी असून त्याच्या कडिल थकीत कर्जावर भरीव सूट देत त्यांचे कर्ज खाते बंद करण्याबाबतच्या सूचना बँकेने त्याच्या ४१५ शाखांना दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले कि कोव्हीड १९ संसर्ग झालेल्या कर्जदारांना मानवीय दृष्टीकोनातून १० टक्के अधिकची व्याज सवलत देण्याबाबत बँकेच्या संचालक मंडळाने सुचविले असून, या योजनेबाबत निर्णय घेताना बँकेच्या संचालक मंडळाने या योजनेचा जास्तीतजास्त थकीत कर्जदारांनी लाभ घेत हि योजना यशस्वी करावी असे आवाहन केले आहे..
या योजनेचे वैशिष्ट असे आहे कि कर्जदाराने त्यांचे थकीत कर्ज परतफेड केल्यावर त्याला लगेच बँकेच्या नियमानुसार नवीन कर्ज दिले जाणार आहे. या योजनेच्या नावानुसारच थकीत कर्ज व्याजात घसघसीत सूट व पुन्हा कर्ज यामुळे नैसर्गिक आपत्तीत आलेल्या शेतकरी बांधवासाठी हि योजना ख-या अर्थाने तारणहार होणार आहे.
थकीत कर्जावरील व्याज सवलत हि बँकेच्या संचालक मंडळाने निश्चित केल्या नुसार थकीत व्याजाच्या ६० ते ७५ टक्के असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सूट सुटीत व्हावी यासाठी बँकेने ऑन लाईन पोर्टल तयार केले असून कर्जदाराचे नाव व त्याला पात्र असलेली सवलत रक्कम या ऑन लाईन पोर्टल वरून शाखेतील अधिकारी सांगतील तेच पोर्टल डाउनलोड करून या योजनेत सहभागी होत असल्याचा अर्ज शेतकरी सहीनिशी करू शकणार आहे.
शेतकरी व थकबाकीदारांपर्यंत हि योजना पोहचावी यासाठी सूटसुटीत व सोपी, तसेच पारदर्शक कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. सदरची योजना मर्यादित कालावधीसाठी असून १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ पर्यंतच हि योजना लागू राहणार आहे.
हि योजना सुरु करण्यामागील बँकेची भूमिका हि आहे कि. शेतकरी बांधवांचे बँकेकडील कर्ज थकीत गेल्यास त्याला कर्जासाठी सावकाराकडे जावे लागते तसेच व्याजदर देखील जास्त लागतो. सरकारने यावर्षी रु तीन लाखापर्यंतच्या के. सी. सी. कर्जास व्याज सवलत योजना जाहीर केली आहे. त्याचा फायदा शेतकरी बांधवापर्यंत पोहचावा यासाठी
हि योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी तारणहार होणार आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना बँकेचे अध्यक्ष मा. मिलिंदजी घारड यांनी वरील प्रमाणे माहिती दिली आहे.
योजनेचा लाभ जास्तीत जास्त खातेदारांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक श्री. संजय वाघ यांनी केले आहे,