मला भावलेला सरपंच. ग्राम पंचायत फुलवळ बालाजी देवकांबळे

मला भावलेला सरपंच.

कंधार

फुलवळ हे गाव सुशिक्षित, सदन,जागरुक, गाव म्हणुन सबंध तालुक्या मध्ये ओळखले जाते.

या गावची लोक संख्या पाच ते सहा हजारच्या जवळ आहे.एवढ्या मोठ्या गावचा गावगाढा सांभाळणे हे तूवढे सोपे नाही .हे आपण ही ओळखता.

पण बालाजी भुजंगा देवकांबळे हा माणुस एक अजब रसायणच म्हणायला हरकत नाही.

शिक्षणात कमी असुनही या गावचा माजी उपसरपंच व आत्ताचा सरपंच म्हणुन त्यांची कारर्किद चांगलीच आहे.

सरपंच म्हटले की राजकारण आलेच, हेवा देवा आलाच. पण या सर्व बाबीना हाताळत आपण चांगले कार्य केले पाहीजे.या विचाराने काम करत असलेला दिलदार माणुस.

कोरोणा सारख्या महामारीत स्वतःच्या निगराणीत दिवस रात्र गावाची काळजी घेत वाटेल व भेटेल त्याची मदत घेत सर्व आरोग्य सेवेला सुरक्षा कीट, सॅनिटायझर गावभर फवारणी,सर्व गल्ली गल्ली फीरुन, गाव प्रमुखांना विश्वासात घेत कोरोणा सारख्या माहा मारीला स्वतावरील संकट समजुन मनलावुन गावाची देखभाल केली हे अभिनंदनीयच आहे.

राजकारण राजकारणाच्या वेळेस .आता आपण सर्व एक ही भावना ठेवुन कोणत्याही विरोधाला न जुमानता अविरत कार्य करणारा हा आमचा कोरोणा योध्दा.

                       बालाजी हा संत निवृत्ती महाराज विद्यालय कंधार येथे सेवक असताना शाळेवर सेवा करत गावाची पण सेवा अतिशय चांगले प्रकारे केली याचा आनंद मला वाटला.

आनंदा पवार ,

नागरिक ,फुलवळ ,ता.कंधार

जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *