श्री रोकडोबा दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन

श्री रोकडोबा दिनदर्शिका  २०२२ चे प्रकाशन

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

श्री क्षेत्र रोकडोबा देवस्थान श्री क्षेत्र परचंडा ता अहमदपूर येथील श्री रोकडोबा दिनदर्शिका २०२२ प्रकाशित करण्यात आली आहे. दिनदर्शिकेचे हे ११ वे वर्षे आहे. सदरील दिनदर्शिकेचे संपादक श्री ह भ प व्यंकटराव महाराज अंकुशवाड टाकळगावकर ( श्रीराम कथाकार, प्रवचन आणि किर्तनकार , ९५५२८३४६०३ ) आहेत.ही दिनदर्शिका १३ पानी आहे.

प्रत्येक पानांच्या पाठीमागे मासिक राशिभविष्य, पंचांग, विवाह मुहूर्त, उपनयन मुहूर्त आणि वास्तुशांती मुहूर्त देण्यात आले आहेत. शिवाय संपादकीय आणि इतरही धार्मिक माहिती दिली आहे. श्री न्रसिंह जयंती निमित्त ५० वा अखंड हरिनाम सप्ताह ( सुवर्ण महोत्सव २०२२ ) मौजे टाकळगाव ता अहमदपूर येथे होणार आहे. त्याचे संयोजक ह भ प व्यंकटराव महाराज अंकुशवाड आहेत.

अगदी कमी दरात म्हणजे केवळ १० रुपये किंमतीत ही दिनदर्शिका भक्तांना कालच्या शनिवारी सकाळी म्हणजे दि ०१ जानेवारी २०२२ ला उपलब्ध करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *