कै. उल्हास कुरूडे सार्वजनिक वाचनालय बहाद्दरपुरा ता. कंधार येथे दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी कै.उल्हास कुरुडे यांची पुण्यतिथी व सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
वाचनालयात सकाळी कै.उल्हास कुरुडे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस मा. उपसरपंच हनमंतराव पा. पेठकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी ग्रंथपाल संजय एमेकर यांनी कै. उल्हास कुरुडे यांच्या जीवनावर आपले विचार मांडले या निमीत्य वाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
हे ग्रंथप्रदर्शन दिवसभर सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते.प्रसंगी ज्येष्ठ स्वा.सेनानी माजी आ. भाईगुरुनाथरावजी कुरुडे साहेब, उपसरपंच हनमंतराव पा. पेठकर, माजी उपसरपंच पंडीत पा. पेठकर, बालाजी तोटवाड, सरपंच प्रतीनिधी विजय गायकवाड,अवधुत पा.पेठकर,भिमराव कदम,ग्रां.प.सदस्य प्रतीनिधी शंकराव खरात,बळी पेठकर,
विशाल टेकाळे, माधव दाताळेकर, संजय फुलवळे,उप मुख्याध्यापक सुधीर कुरुडे, वसंतराव कुरुडे, परशुराम धोंडगे,नितीन टेकाळे,जाधव सर,शंकर आंबेकर,माणिक वंजे,शिनगारे साहेबराव,शे.शफी,प्रदिप इंदुरकर इत्यादी उपस्थित होते ग्रंथपाल संजय एमेकर यांनी सर्वांचे आभार मानले.