कंधार
महाराष्ट्र राज्य सरकारने विद्यापीठ कायद्या मध्ये सुधारणा विधेयक मंजूर केल्या मुळे या विरोधात भारतीय जनता युवा मोर्च्या कंधार च्या वतीने या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना भारतीय जनता युवा मोर्चा कंधारच्या वतीने दोन हजार पत्र पाठवून विरोध करण्यात आला
राज्यातील महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक घाई घाईने पारित करून घेतले.
या काळया विधेयकाच्या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत.विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या ,विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा ,म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारात आहेत.
या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन १० लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठवित आहेत याची सुरुवात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहेत त्याच अनुषंगाने भजपा युवा मोर्च्या कंधारच्या वतीने मुख्यमंत्री यांना आज मुख्यमंत्री यांना पत्रे पाठवण्यात आले या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवानभाऊ राठोड, भाजपा शहर अध्यक्ष अड .गंगाप्रसाद यन्नावार,शहर सरचिटणीस मधुकर पाटील डांगे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ कोळगीरे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष धोंडीराम गडमवाड, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस शिवराज शेकापुरे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस बालाजी तोरणे, भाजपा युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख, दिपक गोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.