बिलोली ; बालाजी कुडके
गेल्या दहा ते बारा दिवसा पासुन सतत चालु आसलेल्या पावसामुळे काढणीला आलेले मुग ,उडीद ,सोयाबिनसह कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसुन सदर नुकसानग्रस्त खरीप पिकाचे कृषि व महसुल विभागा मार्फत पंचनामे करुन शेतक-यांना शासनाने अर्थिक मदत करावी
आशि मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यानी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे आज शुक्रवार रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसा पासुन सतत चालु आसलेल्या पावसामुळे तालुक्यातील मुग ,उडीद हे पिक हाताला आलेले आसताना निसर्गाच्या या लहरीपणामुळे सदरील पिकाच्या शेंगाना कोंब फुटुन पुर्णतःहे हातचे पिक उध्वस्त झाले आसुन यासह सोयाबिन व
कापाशीला देखिल मोठा फटका बसला आसुन यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावर पसरले आसुन कोरोना संसर्गाचा लाँकडाउन व बोगस सोयाबिन बियाणाच्या बेभाव विक्रीतुन दुबारा पेरणीचे महासंकट
आशा बिकट अर्थिक परस्थितीचा सामना करीत खरीप पिक उत्पादन वाढीच्या अपेक्षेने विविध महागडी रासायनिक खते किटक नाशकाच्या फवारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. पण ऐन तोंडचा आलेला
घास कोपलेल्या निसर्गाने हिसकावल्याने शेतकरी माञ हवालदिल झाला आसुन या हवालदिल शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कृषि व महसुल विभागा मार्फत सदरील नुकसानग्रस्त पिकाचे
पंचनामे करुन प्रति हेक्टरी ५० हजार रुपयाची अनुदानाची अर्थिक मदत करावी आशी मागणी अ.भा.भ्र.नि.समितीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यांच्यासह गुलाबराव नरवाडे तोरणेकर,आनंदराव पा.हिवराळे,हाणमंत बळके यानी
आज दि.२१ आँगस्ट शुक्रवार रोजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे तहसिलदार यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.