पोस्ट क्रमांक : ८
इयत्ता : ५ वी
परिसर अभ्यास -2
घटक : उत्कांती
दिः २१/०८/२०२०
वारः शुकवार
मुलांनो मागील तासिकेत आपण उत्क्रांतीची संकल्पना , उत्क्रांतीची गोष्ट शिकलो.उत्क्रांती ही संकल्पना तुम्हाला समजली असेलच .आज आपण खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत .
♦️ प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे
♦️ पृष्ठवंशीय प्राण्यांचे प्रकार
पाठ्यपुस्तकातील उत्क्रांती हा पाठ वाचून खालील स्वाध्याय सोडव.
✍️ **स्वाध्याय** ✍️
१)सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात कोणत्या सजीवांपासून झाली?
२)अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये काय फरक आहे?
३)सस्तन प्राण्यांची कोणती वैशिष्ट्ये आहेत?
४) आपण आदिमानव कोणाला म्हणतो?
५)तुला माहित असणाऱ्या अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय प्राण्यांची यादी कर .
स्कूल फ्रॉम होम
पोस्ट क्रमांक – १०
वर्ग -तिसरा
विषय -भाषा
घटक एकदा गंमत झाली
दिनांक . 21 /8 /2020
बालमित्रांनो,
‘एकदा गंमत झाली ‘ हा पाठ काळजीपुर्वक वाचा. आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
प्रश्न १ला –
खालील शब्दांचे विरुध अर्थी शब्द लिहा ?
१ )सरळ … . . . . . . .
२ )पुढे ………………..
३ )शांत ………………
४ )लांब .. . . . . . . . . .
५ )लहान …….. ……..
६ )हसली ……………..
प्रश्न २ रा ‘टोकदार ‘ या शब्दापैकी टोक शब्दाला ‘ दार ‘ हा शब्द लागून टोकदार शब्द तयार झाला. तसे खालील शब्दाला दार हा शब्द लावून शब्द पुन्हा वहीत लिहा.
१ )रुबाब ………..
२ )धार …………..
३ )तजेल …………
४ )समजुत ….. . . .
५ )पाणी …………
६ )चमक…………..
प्रश्न ३ रा
खालील शब्दांचे अर्थ पालकांना किंवा सरांना फोन करून उत्तरे वहीवर लिहा .
१) अलगद उचलणे .
२ ) सुखावणे .
३ ) एक टक पहाणे .
४) दंग असणे .
बाल मित्रांनो , वरील प्रश्नाचे उत्तरे वहीवर लिहून , आपल्या सरांना त्याचा फोटो काढून पाठवा .