धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन अर्ज भरावयाची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर.

नांदेड ;


 नांदेड जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार 

धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.


 ही योजना २३ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. 

ही शिष्यवृत्ती योजना मुस्लीम, ख्रिश्चन,शीख, पारसी,बौद्ध व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता १ ली ते १० वी च्या सर्व शासकीय/निमशासकीय/अनुदानित/विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.


          सन २०२०-२१ या वर्षासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज   केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया दि. १६-०८-२०२० पासून सुरु झालेली आहे. 

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती नवीन विद्यार्थी (फ्रेश स्टुडंट)  व  नुतनीकरण  विद्यार्थी (रीनिवल स्टुडंट) यांचे ऑनलाईन  अर्ज भरावयाची अंतिम मुदत  दि. ३१-१०-२०२० पर्यंत  आहे. 


सन २०१९-२० या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे  अर्ज  रीनिवल स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. 

तसेच नवीन, इच्छुक  विद्यार्थ्यांचे  अर्ज फ्रेश स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास शेख रुस्तुम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड मो.न. ९६८९३५७२१२ यांच्याशी संपर्क साधावा.

मागील वर्षी ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेची  नोंदणी केलेली नाही अशा शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत तात्काळ करून घेण्यात यावी.


 जर एखाद्या शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत मुख्याध्यापक यांनी  केली नाही तर त्या शाळेला अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे  प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी NSP २.०  पोर्टल वर अर्ज भरता येतील 
परंतु त्या अर्जाची पडताळणी शाळांना करता येणार नाही त्यामुळे हे अर्ज जिल्हा स्तरावर पुढील प्रक्रियेसाठी जाणार नाहीत

त्यामुळे अशा शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या  लाभापासून वंचित राहणार  आहेत. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.


सन २०२०-२१ साठी NSP.२.० पोर्टल वर खालील बदल करण्यात आला आहे.
संबंधित विद्यार्थ्यांची  प्रवेश फी, शैक्षणिक शुल्क व परिरक्षण भत्त्याची रक्कम अर्जामध्ये विद्यार्थ्यांना भरता येणार नाही. .

शाळांनी त्यांच्या लॉगीन मध्ये Add – update details या मेनू मधून वर्गनिहाय विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षात आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती भरावयाची आहे. 


विद्यार्थ्यांच्या अर्जाची शाळा स्तरावर पडताळणी होत असताना संबंधित विद्यार्थ्यांच्या फी बाबत भरावयाची माहिती आपोआप अपडेट होईल. 


जर शाळांनी Add – update details या मेनूमध्ये फी बाबतची माहिती भरली नसेल तर शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये फी बाबतच्या रकान्यामध्ये माहिती संस्थावर अर्ज पडताळणी करताना भरावयाची आहे. 

या रक्कमेबाबत अर्जात नोंद करणे व यात बदल करण्याचा शाळांना पूर्ण अधिकार असेल.


शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे या बाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यामिक)  जिल्हा परिषद नांदेड   यांनी  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *