गणेशोत्सवाच्या काळात विघ्नहर्त्यांचे सदभक्तांना काळजी घेण्याची पत्रातून साद…….!

  पत्रलेखन–दत्तात्रय एमेकर गुरुजी,कंधार

माझ्या प्रिय भक्तांनो…

                         वर्षातल्या पवित्र श्रावण महिन्यात 

सर्व मानव जातीस शुभाशीष….!

जवळपास पाच-सहा महिन्या पासून जगभरात  कोरोनाचा कहर सुरु आहे.माझ्या देशातही त्यांचे थैमान सुरु आहे.पण महाराष्ट्रात देशात कांही दिवसावर माझा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

माझा देश पारतंत्र्यात होता.तेंव्हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जहाल मतवादी व्यक्तीमत्व असलेले लोकमान्य टिळक या भारत मातेच्या वीर पुत्रांनी माझ्या उत्सवाची सुरुवात 1883 साली केली.त्याचे कारणही तसेच होते.इंग्रज फिरंग्यांनी माझ्या देशवासीयांना एकत्र येण्याची मनाई केली होती.

त्यावेळी त्या जाचक गोर्यांच्या आध्यादेशाला केराची टोपली दाखवायचीच!या उद्देशाने आम्हाला आमच्या देवतेच्या अराधनेच्या निमित्याने भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीस माझ्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात करुन, माझा दहा दिवस सकाळ-संध्याकाळ पुजा-अर्चना करत आरती करुन माझा जयघोष करुन.

उत्सवाच्या दहा दिवस करुन,इंग्रजांची सत्ता किती जाचक आहे यावर भारतीयांच्या मनात जनजागृती करुन त्या उत्सवात भारतीय एकत्र येवून या पारतंत्र्याच्या मगरमिठीतून माझ्या भारत मातेची सुटका करण्याचे रणशिंग फुंकले गेले.

पुर्वी माझी अराधना घराघरातून या मीतीस करत असत.फक्त दिड दिवसाचा उत्सव स्वातंत्र्य लढ्यास बळकटी येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक माझ्या मंडळांची निर्मिती करुन माझा घरात असलेला उत्सव सार्वजनिक केला.

पुर्वी महाराष्ट्रा पुरता असलेला उत्सव पुर्ण विश्वात साजरा होतो आहे.पण उत्सव आरंभ झाल्या पासून ही पहिलीच वेळ आली की उत्सव अगदी साध्या प्रमाणात साजरा करावा असे आवाहन शासन स्तरावरुन झाले आहे.

कारण कोरोना महामारी असल्याने कोवीड-१९ या विषाणुचा संसर्ग होवु नये म्हणुन माझा उत्सव अगदी साध्या प्रमाणात व्हावा!उत्सव साजरा करतांना एकत्र येणे टाळा.

शासनाने माझा उत्सव साजरा करतांना कांही अटी व शर्ती लावुन दिल्या आहेत. त्यांचे तंतोतंत अंमलबजावणी करुन यंदा उत्सव अगदी साध्यापणात साजरा करा.दहा दिवस आपण आनंदात उत्सव साजरा करा पण…सोशल डिस्टन्स ठेवून गर्दीच न होण्याची दक्षता घ्या.

कोविड पासून तुम्ही व तुमचा परिवार अन् समाज संसर्गा पासुन बचला पाहिजे.माझ्या आगमना पासुन ते माझ्या विसर्जना पर्यंत माझ्या कोणत्याही भक्तांना कोराना संसर्ग होवू नये याचा खबरदारी सर्व माझ्या मंडळांनी घ्यावा.

कोरोना विषाणु बद्दल जनजागृती करुन या उत्सवात प्रबोधन करण्यावर भर द्यावा.मला पुण्याच्या संस्कृतीक राजधनी सह मुंबई महानगर अन् कोकणात जो उत्साह असतो त्या उत्साहास विश्वात तोडच नाही.एवढच काय साता समुद्रापारही या काळात आनंदोत्सव शिगेला पोहंचलेला असतो.

यंदाच्या उत्सवाचा आनंद कोरोनाने हिरावलाच म्हणावे लागेल.

भक्तांनो तुम्हा घालतो साद।

माझा उत्सव घरीच करा॥

पुढच्या वर्षी यंदाचा आनंद।

सोशल डिस्टन्सींगने जतन करा॥

या वर्षी मला मोदक खातांना गोड लागत नाही.कारण माझा भक्त कोरोना संकटात आहे.गेली सहा महिन्या पासून भयभित आहे.लाॅक डाऊन हा शब्द कधीच कुणास माहिती नव्हता.

सॅनिटायझर,हॅडवाॅश,सोशल डिस्टन्सींग, मास्क,कंटनमेंट झोन,कोवीड सेंटर,आयसोलेट,पाॅझिटीव्ह,निगेटीव्ह,अनलाॅक असे कितीतरी इंग्रजी शब्दांचा दररोज अति वापर  जाणवला.

पण सर्वात जास्त भितीदायक शब्द माझ्या भक्तांना पाॅझीटीव्ह वाटला.माझ्या स्थापणे पासुन ते अनंत चतुर्दशी पर्यंत ज्ञान,प्रबोधन,अथर्वशीर्ष पठण,अन्नदान यातून समाजसेवा दररोज सोत होती त्यावर मर्यादा आल्या.

अनंत चतुर्दशीला मला निरोप देतांना जो कांही मंगल वाद्याच्या तालावर नृत्य करत मला पुढच्या वर्षी लवकर येण्याची आळवणी करत निरोप देतात.

सर्व भक्तांना या उत्सवाच्या औचित्याने

सर्वांनी काळजी घेवुन सुरक्षित रहावे..

सादपत्र लिहितांना शेवटी…

लिहावे वाटतात कितीही शब्द,

लेखनी माझी थांबता थांबेना!

पत्र लेखनातून माझा संदेश,

थोडे प्रबोधनात्मक घ्या ना!

                                आपला

                      शिव-पार्वती गणेश

Dattatrya Yemekar

पत्रलेखन–दत्तात्रय एमेकर गुरुजी,कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *