माजी उपसभापती रामजी गोविंदराव पाटील कल्याणकर यांचे निधन

कंधार

रामजी गोविंदराव पाटील कल्याणकर दिग्रस खू. तालुका कंधार
माजी.सरपंच तथा, माजी उपसभापती प. स.कंधार यांचे hart attack ne दुःखद निधन झाले आहे.
अंत्य संस्कार आज दिनांक 29/01/22 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या मूळ गावी . दिग्रस् खू. या गावी करण्यात येणार आहे.

दिग्रस नगरीचा राजहंस हरपला – सतिश देवकते

दिग्रस नगरीचा राजहंस हरपला – सतिश देवकते

काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुमचे अचानक जाणे….

  ग्रामीण भागातील ओबीसी नेते, काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते, तुमच्या तो लढवय्या बाणा, माझ्यावर असलेलं ते प्रेम,, साहेब तुमच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध दररोज दरवळत राहिल....

साहेब, तुमचं ते स्मित हास्य, बोलण्यातील तो भारदस्त रूबाब, लढण्याची ती ताकद, पक्षातील एकनिष्ठपणा हे मी कसं विसरू….

तसे पाहता….. कंधार पंचायत समितीचे माजी उपसभापती, दिग्रस ग्रामपंचायतीचे अविरत सरपंच, श्री नाईक विद्या मंदिर दिग्रस खु शाळेचे अध्यक्ष अशा अनेक पदांच्या माध्यमातून समाजाची सेवा केली आहे…..
या पदाच्या माध्यमातून व काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही अनेकानेक कामे करून एक आदर्श समाजापुढे रोवला आहे याची कल्पना आम्हाला आहे पण यापुढे याची उणिव कोण भरणार हाही प्रश्न आहेच…??

एक आदर्श व भारदस्त व्यक्तीमत्व अतिशय मेहनती,प्रामाणिक व सर्व समावेशक असे नेतृत्व मा. रामजी पा कल्याणकर यांचे हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे….
समाजातील अतिशय प्रतिष्ठित व मोठं नेतृत्व ईश्वराने हिरावुन नेल आहे.त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कल्याणकर परिवारास हे दुख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना..!

जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *