कै.संभाजी पाटील गिरे यांच्या स्मरणार्थ नेत्र शिबीर व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम संपन्न

गऊळ ; शंकर तेलंग

    श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्थापन झालेल्या निजरा गड महादेव येथे भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्याची सांगता दिना 11-2-2022 रोज शुक्रवार या दिवशी समस्त गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ते औचित्य साधून कै.संभाजीराव पाटील गिरे यांच्या स्मरणार्थ दंडावरील महादेव येथे गोर गरिबांसाठी मोफत नेत्र संगणक तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले.


   माजी जि.प. सदस्य बाबुराव पाटील गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सररील कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
     या तपासणी शिबिरात डॉ. शेख शकील व डॉ. हनुमंत गुट्टे यांच्या सहकार्यातून 450 रुग्णाची नेत्रतपासणी संगणकाद्वारे करण्यात आली. या नेत्रतपासणी शिबिराचा लाभ पेंढू, गऊळ, फकीरदरावाडी , भोजूची वाडी, मानसिंग वाडी, चोळीतांडा, लिंबा तांडा, पटाचा तांडा यासह आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *