ती सुंदरी…
काल टेकडीवर जॉगिंग करत होते .. त्यानंतर सेल्फी घेण्यासाठी थांबले.. दोन स्त्रीया सेल्फी काढत होत्या. त्यातील एकीने एक्सक्युज मी मॅम आमचा फोटो काढणार का असं मला विचारलं. त्यांचा मोबाईल घ्यायला पुढे जाणार इतक्यात एक जण म्हणाली अगं त्यांना काय सांगतेस त्या कोण आहेत माहीतेय का?? .. त्यावर मी हसुन म्हणाले तुमच्यासारखीच स्त्री आहे.. तिला म्हटलं तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देउ मी रोज जॉगिंग ला येते इथे असं म्हणुन चालायला सुरुवात केली.. तितक्यात एका मित्राने हाक मारली , तो पलिकडुन चालला होता .. सोनल उद्या घरी असशील का गं पुस्तक हवय मैत्रीणीला गिफ्ट द्यायचय .. फोन करुन ये आणि घेउन जा असं म्हणुन निघणार तितक्यात ती सुंदरी तिथे आली. मॅम माफ करा मला माहीत नव्हतं तुम्ही बियॉन्ड सेक्सच्या लेखिका आहात. माझ्या फ्रेंडने आता मला सांगितलं ..
त्यावर मी त्यांना म्हटलं आता मला सांगा तुम्हाला माहीत नव्हतं तेच बरं होतं ना. तुमच्या वागण्या बोलण्यात उगाचच ऑकवर्डनेस आला.. सखी म्हणा मला चालेल असं म्हणुन मी चालायला सुरुवात केली आणि मला जाणवलं त्या मुलीला कुठे तरी पाहीलं होतं पण लक्षात येइना.. चालत चालत तळ्यापर्यत पोचले.. रोज २ मिनिटे का होइना तळ्यापाशी थांबते तशी कालही थांबले .. पुन्हा ती सुंदरी माझ्या पाठोपाठ तिथे हजर.. मी त्या दोघीकडे पाहुन हसले आणि म्हणाले मी याआधी तुम्हाला कुठेतरी पाहीलय , लक्षात येत नाही .. त्यावर ती म्हणाली मी इथेच जवळ रहाते.. तुम्ही टेकडीवरच पाहीलं असेल मला तरीही मला तिला खुप जवळुन पाहिल्याचं वाटत होतं कारण चेहरा फमिलीअर होता.. सोनल मॅम खरं तर मला तुम्हाला ओळख द्यायची नव्हती कारण मी तुमच्याकडे म्युरल पेंटींग शिकायला येत होते
.. त्यावेळी तुम्ही मला शिकवलं पण मी तुमची फी दिली नव्हती .. कारण माझ्याकडे पैसे नव्हते आणि तुम्ही माझ्याकडे कधी मागितले पण नाहीत.. तुम्हाला मी फॉलो करते पण मॅम आता मी नोकरी करते. आता पेटीएम करु का लगेच.. मला गिल्टी फील होतय हो.. मी म्हटलं मी पुर्णपणे विसरले होते पण तु प्रामाणिकपणे कबुल केलेस यातच सगळं आलं.. मला माझी फी मिळाली आणि तुमचं सुंदर मनही समजलं..
अशा सुंदर वाटेवर कोण कधी भेटेल सांगता येत नाही.. कोणीही वाईट नाही त्यावेळची परिस्थीती काही गोष्टी करायला भाग पाडते..
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
सोनल गोडबोले
लेखिका.. बियॉन्ड सेक्स