जून , जुलै महिन्यात फुलवळ ते मुंडेवाडी-वाखरड व आंबूलगा ते वाखरड रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली पण ती केवळ नावापुरतीच झाली असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील कांही जाणकार व्यक्ती व शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या. त्यावरुन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता या वृक्ष लागवडीचे गूढ उघडकीला आले.
सदर वृक्ष लागवड चे काम याच विभागातील वनरक्षक असलेल्या सुमन मुंडे-गित्ते यांनीच केले असल्याचे कळले . सरकार लाखों रुपये खर्च करत वृक्ष लागवड करण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करत असतानाच याच विभागातील कर्मचाऱ्यांना मात्र त्याचे काहीच देणेघेणे नसल्यागत लाखोंचा चुराडा करत शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत थातुरमातुर खड्डे करून कुठे कोणते रोपटे लागवड केले हे त्यांनाच माहिती पण आम्ही जेंव्हा प्रत्यक्षात मात्र कुठेही ना खड्डा ना कुठे जगलेले झाड दिसून येत होते तेंव्हा याची पोल खोलली.
भ्रष्टाचारालाही कुठेतरी सीमा असावी , कारण खरच वृक्ष लागवड केलीच असेल तर मग ते खड्डे आणि ती झाडं नेमकी गेली कुठे ? आणि हो जर वृक्ष लागवड केली असेल तर मग त्याचे संगोपन करणेही तेवढेच महत्त्वाचे होते तर तसे संगोपन का केले नाही ? यावरून असेच सिद्ध होते की खरच ही वृक्ष लागवड कागदोपत्री च तर झाली असावी . या सरकार च्या कारभारात असाच भ्रष्टाचार कुठं कुठं आणि कोणकोणत्या विभागात चालू असूनही वरिष्ठ अधिकारी व सरकार यावर अंकुश का घालत नाही असाही प्रश्न सामान्य जनतेला सतावत आहे.
या बोगस वृक्ष लागवड संबंधी संबंधित विभागाच्या वनरक्षक तथा ज्यांनी हे वृक्ष लागवड चे काम केले त्या सुमन मुंडे – गित्ते यांना भ्रमणध्वनी करून सदर वृक्ष लागवड संदर्भात सविस्तर माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत होय ते काम मीच केले असून खड्डे ही केले आहेत आणि झाडे ही लावले आहेत असे सांगून तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आमचे साहेबांना बोलून घ्या अशी प्रतिक्रिया दिली . त्यावरून या विभागाचे वरिष्ठ अधिकारी कंधारे यांना भ्रमणध्वनी वरून माहिती विचारली असता तेही असेच म्हणाले की वृक्ष लागवड झाली असून तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर आमच्या कार्यालयाला येऊन भेटा म्हणजे सविस्तर माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यावरून सदर प्रकार हा संशयास्पद असल्याचे लक्षात येताच धोंडीबा बोरगावे यांनी ता. १३ फेब्रुवारी च्या अंकात सविस्तर बातमी छापून प्रशासनाला जागे केले आणि दुसऱ्याच दिवशी गडबडलेल्या सामाजिक वनीकरण विभागाने फुलवळ-वाखरड रस्त्यावरील गायब झालेली झाडे पुन्हा खड्डे करून लावण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले खरे पण असा भ्रष्टाचार कुठे कुठे आणि किती मोठ्या प्रमाणावर चालू असेल हे त्या त्या अधिकारी व सरकारलाच टाऊक असावा अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.