सेवादास उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा. बालाजी मेघाजी यांची निवड


मुखेड: (दादाराव आगलावे)

सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंत नगर (को.) येथील उपप्राचार्य पदी जीवशास्त्र विभाग प्रमुख बालाजी मारोती मेघाजी घोणशीकर यांची संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड साहेब, सचिव गंगाधर राठोड साहेब यांनी निवड केली आहे.


बालाजी मारोती मेघाजी हे मेघाजीसर याच नावानेच सर्वत्र परिचित आहेत. ते जळकोट तालुक्यातील घोणशी येथील रहिवासी असून 1992 पासून सेवादास उच्च माध्यमिक विद्यालय येथे जीवशास्त्र प्रमुख म्हणून कार्य करतात. अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून मेघाजीसरांचा नावलौकिक आहे.

नुकतेच प्रा. डी..बी.चव्हाण हे सेवानिवृत्त झाल्यामुळे, संस्थेशी अत्यंत प्रामाणिक असलेले मेघाजी सरांची उपप्राचार्य पदी संस्थेकडून वर्णी लागलेली आहे. मेघाजी सर सर्वांशी प्रेमाने राहतात, सर्वांना सहकार्य करणे हे त्यांचा एक प्रामाणिक गूण आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड साहेब, सचिव गंगाधर राठोड साहेब, आमदार डॉ. तुषार राठोड साहेब, जि. प. सदस्य संतोषभाऊ राठोड, प्राचार्य हरिदास राठोड, सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक खा. खा. शेख, प्राचार्य दिलीप गायकवाड, मुख्याध्यापक एम.डी. सूर्यवंशी, मुख्याध्यापक रमेश मैलारे, प्राचार्य अंकुश गायकवाड, प्राचार्या सुनिता राठोड (पवार),

मुख्याध्यापक शिवाजी डावकरे, प्रा. जयपाल राठोड, प्रा. बाबुराव गंदपवाड, प्रा. विजयकुमार जाधव, प्रा. बिरादार सर, प्रा. दत्ता पवार, प्रा. येडेसर, प्रा. सलगर सर, प्रा. सौ. स्वामी बेळीकर मॅडम, उपमुख्याध्यापिका स्वामी मॅडम, मुख्य लिपिक बालाजी इंगोले, दिनेश कुलकर्णी सर, मुख्याध्यापक गोविंद पवार, मुख्याध्यापक शमसोद्दीन शेख, प्राचार्य डी.एन. गायकवाड,

प्रा. रीजवान सर, प्रा. दत्ता बिलेवाड, प्रा. संतोष पाटील बेळीकर, मुख्याध्यापक आर.डी. राठोड, संस्कृती विभाग प्रमुख भारत जायभाये, पर्यवेक्षक सुभाष राठोड, पत्रकार दादाराव आगलावे, यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *