नांदेड
” जे कां रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा”
या उक्तीप्रमाणे जिवण जगले.मराठा कुळातील देशमुख घराण्यातील सर्व रिती-रिवाज स्वतः ला कधीच कमी न समजता चारित्र्य जपून गुणवत्तेच्या आत्मविश्वासाने स्वतःच्या बळावर नांव लौकिक करणे खुप मोठी गोष्ट आहे.
कै.गंगाधररावजी देशमुख कुंटुरकर साहेबांच्या जिवणात अंत्यत संघर्षमय आसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे सोपे नव्हते पण त्यांनी हे निर्माण करुण दाखविले हे विशेष आहे,
कुंटुर या गावापासून राजकारणात ग्रामपंचायत.सेवा सहकारी सोसायटी.कृषी उत्पन्न बाजार समीती.पं.समीती.जिल्हा परिषद.सहकारी कारखाना.विधानसभा.विधानपरिषद.लोकसभा आश्या सर्वच राजकीय क्षेत्रातील एक दांडगा आभ्यास साहेबांच्या व्यक्तीमत्वात होता.
नांदेड जिल्ह्यातील राजकारणात एक वेगळा दबदबा निर्माण केला होता,कुठल्याही पदाचा गर्व.अहकांर आला नाही.नेहमी लोकांच्या गर्दीत राहाणे.लोकांच्या आडी-आडचणी सोडवणे.धाडसी निर्णय क्षमता होती आजच्या राजकारणात हे पाहायला मिळत नाही.महाराष्ट्रातील नामवंत नेते यांच्या व्यक्तीमत्व प्रभावित आसायची कै.गंगाधरराव देशमुख कुंटुरकर साहेब यानी सर्व राजकीय पदे भुषवली हि बाब खुप महत्त्वाची आहे.
कै,गंगाधरराव देशमुख कुंटुरकर साहेब याचे आकस्मिकत 3 एप्रिल 2021 रोजी अपल्यातुन निघून गेले.माणुस म्हणून जन्माला येऊन संतपदीवर आरूढ होणे हि मानवी जीवणाची इतिकर्तव्यता आसते.जन्म जरी आपल्या हातामध्ये नसला तरिही जन्म-मृत्यूमध्ये आसणा-या प्रारब्धजन्य कालखंडामध्ये आपला संस्कार.विचार.संग.आणी या सर्वातून उद्भवणारे कर्म या सर्वामुळे आपण जिवणाची धन्यता प्राप्त करुण घेऊ शकतो.
कै,गंगाधरराव देशमुख कुंटुरकर साहेब यांचे राजकीय कौटुंबिक वारस राजेश गंगाधरराव देशमुख कुंटुरकर व रूपेश गंगाधरराव देशमुख कुंटुरकर हे आज अतिशय सार्थपणे चालवत आहेत.
माजी मंत्री स्व गंगाधरराव देशमुख कुंटुरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन……
सुनिल रामदासी
9423136441