नांदेड
शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धनराज उर्फ बाळू पाटील लुंगारे यांनी आज दि.२१ रोजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
बाळू पाटील लुंगारे यांच्या सोबत कंधार तालुक्यातील पांडुरंग पाटील लुंगारे, विजय पाटील लुंगारे, माधव पाटील डांगे, प्रताप पाटील डांगे,
राहुल कल्याणकर, माधव कल्याणकर, नामदेव आदमपुरे, भगवान फुलवळे, प्रमोद डांगे, आतम लुंगारे, अजिंक्य यन्नावार,
माधव डांगे, युवराज लुंगारे, धिरज वाकोरे, कृष्णा वरपडे, सौरभ लुंगारे, योगेश कौंसल्य यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे लोहा विधानसभेचे युवा नेते. बाळासाहेब पाटील कराळे, ग्रामसभा संघटक गणेशभाऊ कुंटेवार. सुरेश पाटील हिलाल, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष.
बळीराम पवार सर. तालुकाप्रमुख माधव मुसळे, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, स्वप्नील पाटील गारोळे, चंद्रकांत पाटील आडगावकर,
मिलिंद पाटील पवार, शंकरराव शिरसाट, यांची उपस्थिती होती.