राज्य परिवहन महामंडळाच्या बस जिल्ह्यातील विविध मार्गांवर धावल्या

 

नांदेड दि. 21 :

मिशन बिगेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा-सुविधा जनतेला उपलब्ध करुन देण्याच्या धोरणाअंतर्गत आता राज्य परिवहन महामंडळाच्या विविध बससेवा सुरु करण्यात आल्या आहेत.

नांदेड विभागातील भोकर, किनवट, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली, माहूर आणि नांदेड आगारामार्फत विविध मार्गांवर 20 ऑगस्ट पासून बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळ नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी दिली. 

 नांदेड आगारातून सातारा, पुणे, सोलापूर, नागपूर, लातूर, हिंगोली, शिराढोण, टेंभुर्णी, कलंबर, सावरगाव, इज्जतगाव आदी मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे.

भोकर आगारातून अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, लातूर, नरसी, नांदेड या मार्गांवर बसेस सुरु झाल्या आहेत.

किनवट आगारातून औरंगाबाद, नागपूर, अमरावती, यवतमाळ, लातूर, नांदेड, माहूर या मार्गांवर बसेस धावतील.

मुखेड आगारातून पुणे, सिंगनापूर, अमरावती, सोलापूर, लातूर, नांदेड, शिरुर, उदगीर, देगलूर, कंधार, मुक्रमाबाद, हंगीरगा या मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली आहे.

 देगलूर आगारातून पंढरपूर, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, उदगीर, सांगवी, शेवाळा, भोकसखेडा, मुक्रमाबाद, हनेगाव या मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली आहे.

कंधार आगारातून नागपूर, रिसोड, लातूर, नांदेड, गंगाखेड, जळकोट, नरसी, शिराढोण, लोहा, पुर्णा, आष्टूर, चोंढी या मार्गावर बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

हदगाव आगारातून अकलूज, अक्कलकोट, सोलापूर, औरंगाबाद, अकोला, उदगीर, बाळापूर, नांदेड, पुसद, माहूर, भोकर, हिमायतनगर या मार्गावर बसे सेवा सुरु करण्यात आली आहे.

बिलोली आगारातून औरंगाबाद, अमरावती, अकोला, रिसोड, नांदेड, देगलूर, कंधार, धर्माबाद, नरसी, देगलूर येथे सुरु करण्यात आली आहे.

माहूर आगारातून बार्शी, लातूर, मुखेड, अमरावती, नागपूर, परळी, यवतमाळ, नांदेड, किनवट, शिखर या मार्गावर बससेवा सुरु केलेली आहे. 

  प्रवास करतांना वैयक्तिक सुरक्षितता व शासनाचे कोविड-19 संदर्भातील नियम याचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *