केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे याचा राजीनामा घ्या – शिवशंकर सावरकर


कंधार :-

केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे यांनी एका सभेत नाभिक समाजाबदल अपशब्द बोलुन समाजाचा अपमान केला असुन समाजाच्या भावना तिव्र दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दयावा अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कंधार ता. अध्यक्ष शिवशंकर सावरकर यांनी मा. तहसिलदार साहेब यांना निवेदन देऊन केली आहे.


दि. 8 मार्च 2022 रोजी दुपारी 2 वाजता मा. तहसिलदार , तहसिल कार्यालय कंधार याना महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कंधार च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे कि, केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे यांनी एका भाषनात नाभिक समाजाबदल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे. राजकीय भाषणे करताना बहुजन समाजाला उद्देशून अपशब्द बोलणे हे दानवेचे हमेशाचे कृत्य असुन ते नाभिक समाजाची निंदनीय शब्दात अपमान केला आहे.

यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तिव्र झाल्या असुन दानवेचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामी बदल जाहीर माफी मागावी अन्यथा संपूर्ण राज्यातील नाभिक समाज आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.


या निवेदनावर अध्यक्ष शिवशंकर सावरकर, माजी उपाध्यक्ष ओमकार सुर्यवंशी, सचिव राजीव श्रीमंगले, नामदेव श्रीमंगले, प्रभाकर श्रीमंगले, अप्पाराव श्रीमंगले, रामदास श्रीमंगले, राम राजगीरे आदिच्या स्वाक्ष-या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *