कंधार ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत संदर्भित विद्यार्थी रोगनिदान शिबीर संपन्न

आज दिनांक:-09/03/22 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.आर.लोणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत नेत्ररोग तपासणी शिबिर संदर्भित विद्यार्थी रोगनिदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे.


राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट् शासन आरोग्य सेवा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत संदर्भित विद्यार्थी रोगनिदान शिबिर ग्रामीण रुग्णालय कंधार येथे संपन्न झाला असून यामध्ये नेत्ररोग तपासणी शिबिर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकामार्फत करण्यात आली त्यामध्ये शाळा/अंगणवाडी यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली होती. त्यामध्ये आपल्या तालुकांतर्गत केंद्रामधील शाळेतील/अंगणवाडीतील काही विद्यार्थ्यांना दृष्टी दोष असल्याचे आढळून आले आहे. दृष्टिदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर नेत्रचिकित्सक डॉ.गजानन सेंडेराव व नेत्रचिकित्सा अधिकारी
डॉ.जि. जे.भालेराव साहेब यांच्याकडून 140 दृष्टीदोष बालकांची तपासणी करण्यात आली 45 विद्यार्थी यांना दृष्टिदोष शस्त्रक्रियासाठी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात आले.


तसेच 54 एवढे विद्यार्थी यांना चष्मासाठी निवड करण्यात आली. शिबिरासाठी डॉ. श्रीकांत मोरे,डॉ. शाहीन मॅडम,डॉ. गजानन पवार,डॉ. उजमा तबस्सुम,डॉ. अरुणकुमार राठोड,डॉ.नम्रता ढोणे,व कर्मचारी श्री.कांबळे दिलीप, श्री.शंकर चिवडे, श्री.लक्षमन घोरपडे
( औषध निर्माण अधिकारी),श्रीमती. प्रियंका गलांडे,श्रीमती. सुरेखा मैलारे, श्रीमती. सुनिता वाघमारे व शिक्षणाधिकारी ऑफिस मधील कर्मचारी श्री.प्रदुम्नसिंह काळे (विशेष शिक्षण तज्ञ कर्णदोष)
श्री.आनंद तपासे (विशेष शिक्षक)
श्री. बालाजी निवळे
(विशेष शिक्षक)
सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *