या बैठकीस दस्तुरखुद्द स्वागत अध्यक्षा डॉ अंजुम कादरी उपस्थित होत्या. चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते श्री मच्छिंद्र गोजमे सर अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. पार – येस्तार आणि मोघ्यासह ,कंधार, जळकोट आणि उदगीर येथील लेखक आणि कवींनी या बैठकीत सहभाग घेतला. बैठकीत स्वागत, अर्थ, संयोजन, सल्लागार, एक रुपया आणि मुठभर धान्य, प्रसिद्धी, कथाकथन व परिसंवाद आणि कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या कविंची यादी तयार करण्यासाठी समित्या गठीत करण्यात आल्या.
या बैठकीला मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा गोविंदराव शेळके, डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, वाय डी वाघमारे ,अनिसचे राज्य सरचिटणीस हरिदास तम्मेवार सर, माजी प्राचार्य तुकाराम हरगिले, विद्रोही कवी प्रा भगवान बामणे कंधार, विद्रोही कवी अंकुश सिंदगीकर जळकोट, श्रीमान राजीव पाटील जळकोट, ता अध्यक्ष मराठा सेवा संघ अशोकराव चापटे, प्रशांत जाभाडे, श्रीनिवास एकुरकेकर उदगीर नाना कदम, सिद्देश्वर लांडगे, सौ मनोरमा जाधव ,जीवनराव नवटक्के, दत्तात्रय कदम, जाधव जे यू कवी डॉ अकबर लाला, कवी मुरहारी कराड, शिवाजी नामपल्ले आणि प्रा भगवान आमलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन हरिदास तम्मेवार यांनी केले.