जि प शाळा सावरगड येथे जागतिक महिला दिन वेगळ्या पद्धती ने साजरा

यवतमाळ ; प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सावरगड केंद्र पांढरी पं.स यवतमाळ येथे उपक्रमशील शिक्षक तथा तालुका स्काउट मास्टर रविनाश राठोड यांच्या कल्पनेतून विध्यार्थीनी च्या नावाची नेम प्लेट तयार करून ज्यावर आईचे पण नाव आहे अशी पाटी सर्व विद्यार्थीनी ना भारत स्काउट गाईड कार्यालय यवतमाळ चे जिल्हा संघटक श्री गजानन गायकवाड, श्री काकपूरे सर ,पंचायत समिती सदस्या सौ सुनंदा ताई प्रदीपराव भुजाडे ,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संदीप भाऊ देवकर मुख्याध्यापिका आशा नगराळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले .


गायकवाड सरांनी शालेय परिसर पाहून आनंद व्यक्त करत मुलांना मार्गदर्शन केले .महा दीप परीक्षेत दुसऱ्या फेरी साठी पात्र अक्षरा भिसे आणि अंजली वायकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले


कार्यक्रमात काकपूरे सर रमाकांत मोहरकर यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैजयंती मैंदळकर यांनी तर संचलन रविनाश राठोड तर आभार प्रदर्शन गणेश फुपरे सर यांनी मानले याप्रसंगी मुख्याध्यापिका आशा नगराळे श्री प्रदीप खंडाळकर श्री रमाकांत मोहरकर वैजयंती मैंदळकर स्वाती पवार गणेश फुपरे रविनाश राठोड उर्दू शाळेचे मुख्याध्यापक फैय्याज सर


अकिला मँडम ,मदतनीस रेशमा ताई शेंडे माधुरीताई मेंढे उपस्थित होते. जिल्हा संघटक गायकवाड सरांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *