स्काऊट गाईड कार्यालय व श्री निकेतन हायस्कूल, नांदेड यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

नांदेड ; प्रतिनिधी

स्काऊट गाईड कार्यालय व श्री निकेतन हायस्कूल, नांदेड यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान व त्यांचं विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी महिलांचे आरोग्य व मुलींच्या समस्या याबाबत डॉ. सौ सुजाता पाटोदेकर यांनी मार्गदर्शन केले, तर स्काऊट गाईड विषयाबाबत श्रीमती भागीरथी बच्चेवार,श्रीमती शिवकाशी तांडे,श्रीमती मीना झाडबुके,गाईडर सौ.सारिका मद्दलवार यांनी मार्गदर्शन केले,तसेच रसायन अधिव्याख्याता श्रीमती बेट्टीगिरी यांनी मार्गदर्शन केले,

तसेच कायदेविषयक माहिती वकील श्रीमती ज्योती कांबळे यांनी दिली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सहसचिव तथा मुख्यध्यापिका श्री निकेतन प्रा.विद्यालय यांनी भूषविले. प्रमुख अतिथी श्री निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री थोरात यांची उपस्थिती होती.तसेच या दिनाच्या निमित्ताने माता पालक यांचे देखील स्वागत करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही मुख्याध्यापक, शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका स्कॉऊटर-गाईडर यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती गीता जगधने यांनी तर आभार श्रीमती सोनकांबळे यांनी मानले …


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *