यवतमाळ ; प्रतिनिधी
सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा संघटन आयुक्त गाईड कु कविता पवार व कु नितीमा रोकडे गाईड कॅप्टन राष्ट्रीय विद्यालय आडगाव,पुसद यांनी केले. स्पर्धाचे पारितोषिक वितरण समारंभ आज दिनांक ०८:०३:२०२२ जागतिक महिला दिनी बक्षीस वितरण सोहळा ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने घेण्यातआला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री.प्रमोद सुर्यवंशी होते.प्रमुख अतिथी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नंदा खुरपुडे होत्या.तसेच उपशिक्षणाधिकारी (प्राथ) श्री.राजु मडावी, माजी राज्य चिटणीस तथा लिडर ट्रेनर श्री.भगवान जामकर, असीस्टंट लिडर ट्रेनर श्रीमती.सुरेखा टोणे, माजी जिल्हा चिटणीस श्री.गजानन भटुरकर, जिल्हा संघटक (स्काऊट) श्री.गजानन गायकवाड , ज्येष्ठ स्काऊटर श्री. नागोराव काकपूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सेवानिवृत प्राचार्या दिवंगत सुनंदा जामकर मॅडम यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा , फॅन्सी ड्रेस स्पर्धा ,पोस्टर मेकींग स्पर्धा व नृत्य स्पर्धाचे पारितोषिक वितरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री.भगवान जामकर हे शुभेच्छा संदेशात उत्साही गाईडकॅप्टन यांनी चळवळ वाढीसाठी कार्यरत रहावे सांगीतले. श्री.राजु मडावी यांनी दहा गाभाभूत घटकातील स्त्री -पुरुष समानता हा संस्कार अध्यापनातून रुजवावा असे सांगितले.
तर नंदा खुरपुडे यांनी जागतिक महिला दिनाचे उद्देश्य सार्थक करण्यासाठी समाजातील शेवटच्या स्त्री पर्यंत पोहचले पाहिजे. त्यासाठी सक्षम व सबल स्त्रीयांनी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी यांनी आपल्या समारोपिय भाषणात स्त्री कर्तृत्वाचा गौरव केला. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना दुर्गारूपाशी तुलना केली. याप्रसंगी वरिष्ठ लिपिक प्रतीमा चौधरी, जिल्ह्यातील फ्लॉक लीडर व गाईड कॅप्टन सीमा मूनगिनवार,प्रणिता डफर, वनिता झुरळे, अर्चना डोळस, सुनिता मेश्राम,सोनल बेले, हर्षदा ग्वालंबस, जागृती ठाकरे व इतर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.कविता पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गजानन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ लिपिक श्री. संजय केवदे, श्री.किरण लहाणे आणि शिपाई श्रीमती. दिशा सिंगारकर यांनी परिश्रम घेतले.