नगरपरिषद कंधार कार्यालयाने वसूलीचे कडक मोहीम हाती घेत शहरातील तिन मोबाईल टॉवर केले सील

कंधार ; प्रतिनिधी

सहा जिल्हाधिकारी कार्तीकेयन  प्रशासक नगरपरिषद कंधार यांच्या निर्देशानुसार नगरपरिषद कंधार कार्यालयाने वसूलीचे कडक मोहीम हाती घेतली असून आज बुधवार दि.९ मार्च रोजी १४ लाख ३८ हजार रुपयाच्या वसूलीसाठी व अन्य कराच्या वसूलीसाठी  शहरातील तिन टॉवरला सिल ठोकण्यात आली आहे

दिनांक 08/03/2022 रोजी Reliance Jio (Summit Digital Pvd.Ltd. Company) चे व ATC Infrastructure Service Ltd. Company चे मोबाईल टॉवर सील करण्यात आले व

l

दिनांक 09/03/2022 रोजी B.S.N.L. कंपनीचे नगरपरिषद कंधार येथे असलेले दोन मोबाईल टॉवर सील करण्यात आले B.S.N.L. कपंनीकडे दोन मोबाईल टॉवरची एकूण थकीत रक्कम 14,38,684/ रुपये आहे.

थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टीसाठी नळ कनेक्शन तोडण्याची सक्त कार्यवाही करण्यात येणार आहे .सदर वसूलीची मोहीम श्री कारभारी दिवेकर मुख्याधिकारी कंधार यांचे मार्गदर्शनाखाली खालील कर्मचारी राबवत असून

दि.९ मार्च रोजी झालेल्या कार्यवाहीत यावेळी  टॉवर वसुली पथकामध्ये साळवे नागनाथ केशवराव (कर निरीक्षक),राठोड सोनाली बाबु (करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी), बडवणे सतिश सुर्यकांत (वसूली लिपीक), खोडसकर राहुल भास्करराव (वसूली लिपीक) लता ढवळे, दिलीप कांबळे, कल्याण गायकवाड, अब्दुल शेख, सदाशिव, गोविंद केंद्रे आदीची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *