कंधार
नुकत्याच झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येताच भारतीय जनता पार्टीला चार राज्यांमध्ये मिळालेल्या स्पष्ट बहुमताचा आनंद उत्सव भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने शहरातील चौकात अतिषबाजी करून कंधार मध्ये साजरा केला
उत्तर प्रदेश ,मनिपुर ,उत्तराखंड, व गोवा या चार राज्यात भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले या राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते .सबका साथ सबका विकास हे ध्येय समोर ठेवून भाजप ची विजयी घोडदौड सुरू झाली, नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणूकां पैकी चार राज्यात स्पष्ट बहुमत आल्याचा आनंद उत्सव फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय जनता पार्टी कंदार च्या वतीने आनंद उत्सव साजरा केला
शहरातील महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे संपर्क कार्यालय या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली व कार्यकर्त्यांना मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,भाजपाचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, सरचिटणीस मधुकर डांगे, चेतन भाऊ केंद्रे , सदाशिव नाईकवाडे, शाहूराज गोरे, व्यंकट नागलवाड ,बालाजी तोटावाड ,महेश मोरे ,शेखर वडजकर, सागर डोंगरजकर,अभि इंदूरकर , नाना चिवळे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती