कंधार ;
चालू वर्षात केंद्रातील अर्थसंकल्प मांडताना श्रीमती निर्मला सीतारमण (अर्थमंत्री ) यांनी कृषिप्रधान देशात शेती क्षेत्राबाबत बजेटच्या शेवटी भाषणात निमित्तमात्र उल्लेख करून शेतकरी समाजाची निराशा केली होती , पण आजच्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाची सुरुवातच माननीय अजित दादांनी राज्यातील शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्थेत सर्व क्षेत्रापेक्षा महत्त्वाचे स्थान आहे हे सांगून संकट काळातही चालू वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती व सेवाक्षेत्र यांच्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था टिकून असल्याचे मत व्यक्त करत भूविकास बँकेच्या कर्जा सारखे जुनाट व लाखो शेतकऱ्यांना अडचणीचे वाटणारे कर्ज संपविले .
शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्याची बांधिलकी स्वीकारले. विशेष म्हणजे केंद्राची अडचणीची व अन्यायकारक ठरलेली पिक विमा योजना राज्यात नव्या रूपात शेतकरी हित लक्षात घेऊन आणण्याची भूमिका घेतली , दुसरे म्हणजे शेतकऱ्याच्या हळद , कापूस , सोयाबीन या नगदी पिकांच्या मुल वर्धनासाठी काम करण्याची गरज ओळखून त्यासाठी संशोधन , प्रक्रियेला चालना देण्यासाठी ची तरतूदही केल्याचे सांगितले .
सर्वात महत्त्वाची शेती सिंचनासाठी जलसंपदा विभागालाही तरतुदही बऱ्यापैकी करून पाझर तलावाचे पुनःजिवन करून साठवण तलावात करण्याची महत्त्वाची भूमिका घेतली .
एकंदरीत पहिल्यांदाच अर्थमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या बजेट मध्ये बहुतांशी शेती व शेतकऱ्यांचे प्रतिबिंब दिसत आहे . केंद्राकडून शेतीक्षेत्राला नाकारण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी राज्याच्या बजेटमध्ये माननीय अजितदादांनी शेतकरी समाजाला हिंमत व मान सन्मान देण्याचा आशादायी प्रयत्न निश्चितच केला असल्याचे मत शंकर अणा धोंडगे यांनी व्यक्त केले .