पानभोसी गावाने अनेक धूरदंर नेतृत्व तालुक्यात निर्माण केले आहेत.यामागे स्त्री शक्तीचा मोठा हात आहे. महिलांच्या त्याग व संस्कारातून नेतृत्व निर्माण होते.अशा नेतृत्वाने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.
तसेच अनेक महिलांचे विविध क्षेत्रातील कर्तृत्व दुर्लक्षित असते.अशा स्त्रीयांचा यथोचित गौरव करण्याचा संकल्प ग्रामपंचायत सरपंच राजेश्रीताई मनोहर पा.भोसीकर यांनी पुढाकार घेतला.अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका, महिला बचत गट,एक मुलगी असलेल्या व दोन मुली असलेल्या माता,कोविड काळात कार्य केलेल्या जि.प.शिक्षिका ,अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस ,आशा वर्कर ,हिरकणी महिला ग्राम संघ आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या प्रथम नागरिक राजेश्रीताई पा.भोसीकर होत्या.यावेळी बोलताना राजेश्री ताई भोसीकर पुढे म्हणाल्या की ,ग्रामीण भागातील महिला बुजऱ्या , लाजऱ्या असतात. त्यामुळे गुणवत्ता असूनही कर्तृत्व झाकोळण्याची शक्यता असते.त्यामुळे आधुनिक काळाची पावले ओळखून निर्भयपणे कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रमुख उपस्थिती अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा चव्हाण, मनोहर पा.भोसीकर ,बापुसाहेब गौंड, ग्रामविकास अधिकारी परशुराम वाडीकर यांची होती. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या स्वरूपा लुंगारे, ताहेराबी शेख,सुमनबाई जोंधळे,सविता नाईकवाडे ,शेख रहिम, सय्यद ताजोद्दीनसाब ,निळकंठ डोम,विश्वेश्वर पांचाळ,दिलीप जोंधळे सह महिला ,पुरूष ,ग्रामस्थ आदीची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सुप्रियाताई नाईकवाडे तर आभार मनोहर पा.भोसीकर यांनी मानले.