नांदेड-
रमाई गॅस कंधार एजन्सी चे मालक, नांदेड जिल्ह्यातील लढवय्ये भीमसैनिक, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते,
तथा वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रूपकदादा जोंधळे यांचे हृदयविकारामुळे आज दि.२३ आॅगस्ट, रविवार रोजी सकाळी ०४:०० वा. दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आजच दुपारी २ वाजता वैशाली नगर तरोडा बु. नांदेड येथील राहत्या घरुन निघणार आहे.
रुपकदादा हे आदरणीय अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक राहिलेले आहेत. मृत्यू समयी त्यांचे वय ५२ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
‘अल्पावधीतच व्यवसाय आणि आबेडकरवादी चळवळीत सतत अग्रेसर, आक्रमक असलेला लढवय्या रूपक जोंधळे गेल्याचे अतिदुख झाले.
परवाच फोनवर बोललो. चळवळ कुठे जात आहे, यावर चर्चा झाली. निधनाचे वृत्त ऐकून विश्वासच बसत नाही.
रूपक गेला. बाळासाहेब आंबेडकरा
चा नांदेड मधील इमानदार कार्यकर्ता गेला. माझ्या दृष्टीने फार मोठी सामाजिक हानी झाली आहे असे मी समजतो.’
– ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे