कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर चाल करून गेलेल्या आंदोलकांच्या कृत्याचा कंधार तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला असून, हल्लेखोरांवर कठोरातलीकठोर कार्यवाही करावी असे निवेदन (९ एप्रिल) कंधार पोलीसांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केले आहे.
एस.टी. महामंडळाच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी शरद पवारांच्या घरावर चाल करुन गेलेल्यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर , दत्ता कारामुंगे , बाबुराव केंद्रे , गोपीनाथ केंद्रे , संतोष कागणे , राजकुमार केकटे , आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.