रामरहिम नगर कंधार येथे महामानवाची जयंती जल्लोषात साजरी


कंधार: भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रामरहीम नगर कंधार येथील चौकाच्या फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा शाखा कंधार चे तालुका अध्यक्ष विलास अण्णा कांबळे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी समता सैनिक दलाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनकांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव नामदेवराव कांबळे,शहराध्यक्ष निलेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,MIM चे युवा तालुका अध्यक्ष शेख मकसूद,समता सैनिक दल कंधार चे तालुका उपाध्यक्ष संतोष दुंडे,सैनिक विलास ढवळे,विलास सोनकांबळे,सुधाकर सोनकांबळे,पांडुरंग सोनकांबळे, मुख्याध्यापक सुर्यकांत सोनकांबळे सर,भांड्यांचे व्यापारी शेख तालेबअली, लुंगारे वसंत, साहिल,पत्रकार संभाजी कांबळे आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *