डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कंधार तालुक्यात विविध कार्यक्रमाने साजरी

कंधार ;

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने माजी खासदार व आमदार डॉ.केशवराव धोंडगे यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर अस्थी स्मारक भीमगड कंधार येथे अभिवादन केले. तर कंधार शहरासह तालुक्यात आज गुरुवार दि.१४ एप्रिल रोजी विविध उपक्रम राबवून महामानवास अभिवादन करण्यात आले.

  काँग्रेस कार्यालय कंधार येथे  तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
 यावेळी मा नगराध्यक्ष रामराव पवार , जेष्ठ नेते अॅड पुलकुंडवार , तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे , महिला तालुकाध्यक्ष सौ आशाताई गायकवाड, शहराध्यक्ष हम्मीद भाई सुलेमान, विद्यमान नगरसेवक डॉ बडवणे , मा नगरसेवक बंडू अण्णा कांबळे, तालुकाध्यक्ष सोशल मिडिया  प्रमुख सतिश देवकत्‍ते आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून श्री संत तुकाराम महाराज प्राथमिक शाळा कंधार येथे भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ . चित्ररेखा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा अनुवाचन स्पर्धेचा कार्यक्रम घेण्यात आला .

फुलवळ येथील ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच विमलबाई मंगनाळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर जि. प.कें. प्रा.शाळेत मुख्याध्यापक बालाजी केंद्रे आणि श्री बसवेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक बी एन मंगनाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून या महामानवास अभिवादन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *