फुलवळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

       महामानव , बोधिसत्व , भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त फुलवळ ता.कंधार येथे ठिकठिकाणी आज १४ एप्रिल रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.



 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोहळा साजरा करतांना फुलवळ येथील ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच विमलबाई मंगनाळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर जि. प.कें. प्रा.शाळेत मुख्याध्यापक बालाजी केंद्रे आणि श्री बसवेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक बी एन मंगनाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून या महामानवास अभिवादन करण्यात आले .

   यावेळी दोन्ही शाळेतील शिक्षक , शिक्षिका तसेच ग्राम पंचायत चे सदस्य , शालेय व्यवस्थापन समिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश पांचाळ , उपाध्यक्ष साईनाथ बोरगावे , समितीचे सर्व सदस्य , पालक , गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   तसेच फुलवळ बसस्टँड शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सरपंच सौ विमलबाई मंगनाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पंचशील ध्वजारोहण करून सार्वजनिक जयंती सोहळा साजरा करण्यात आला. 

    यावेळी नागनाथ मंगनाळे , धोंडीबा मंगनाळे , बालाजी देवकांबळे , चंदबस मंगनाळे , प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे ,  बसवेश्वर मंगनाळे , नागेश सादलापुरे , बालाजी केंद्रे , बापूराव मंगनाळे , नवनाथ , बनसोडे , नागेश गोधने , रामचंद्र वाघमारे , एकनाथ गोधने , परमेश्वर डांगे , उमर शेख , रब्बानी शेख , सागर मंगनाळे , शादुल शेख , छत्रपती देवकांबळे , मंगेश पांचाळ , साईनाथ बोरगावे , कैलास फुलवळे सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *