भाग्यवंताघरी भजन पुजन स्व.शांताबाई पोतदार यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने फुलवळमध्ये किर्तनाचे आयोजन.


फुलवळ ( प्रा भगवान आमलापुरे )

स्व मातोश्री शांताबाई रूक्मांगद पोतदार यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने आज सोमवार दि १८ एप्रिल २२ रोजी फुलवळमध्ये रात्री ०९ : ०० ते ११:०० वाजता ह भ प क्रष्णा महाराज राजुरकर यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


सदरील किर्तनास फुलवळसह मौजे कंधारेवाडी, मुंडेवाडी आणि सोमासवाडी येथील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहे. दरम्यान स्व मातोश्री शांताबाई रू पोतदार यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने सायंकाळी ०४ : ०० ते ०८ : ०० वाजेपर्यंत सुरुची भोजनाचे आयोजन केले आहे.

सुरुची भोजन आणि हरीकिर्तन या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद ता कंधार, ज्ञानेश्वर रू पोतदार आणि निव्रती रू पोतदार यांनी केले आहे. सदरील दोन्ही कार्यक्रम हनुमान मंदिर परिसर,नवे गावठाण फुलवळ येथे पार पडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *