कंधार ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य मेळावा व सर्वरोग निदान शिबिर व उपचाराचे आयोजन

कंधार ;

आरोग्य सेवा व संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन मुंबई,आदेशानुसार
कंधार ग्रामीण रुग्णालयात दि:-18/04/22 रोज सोमवार या दिवशी ठीक 9:00 वा .डॉ.लोणीकर ,वैद्यकीय अधीक्षक यांनी आयोजित केले असून, जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर ,डॉ हणमंत पाटील आर,एम, ओ. सामान्य रुग्णालय नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली
कंधार ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळावा चे आयोजन केले आहे.कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील सर्व सुजान जनतेला सूचित करण्यात येते की कंधार ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग निदान उपचार व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

आरोग्य सोयी सुविधांचा पूर्ण लाभ मिळावा या हेतूने मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर साहेब यांच्या आदेशानुसार तालुकास्तरावर सर्व आरोग्य यंत्रणांच्या कार्यक्षेत्रात तेथील जनतेला सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळावा निदान व उपचार सुविधा साठी मार्गदर्शन मिळावे या हेतूने आयोजन करण्यात आले आहे. सर्वरोग निदान व उपचार सर्व प्रकारच्या शारीरिक व्याधी व त्रास व त्यांचे उपचार याचे जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सुद्धा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांची उपस्थिती असणार आहे. नांदेड जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर यांची उपस्थिती राहणार आहे यामध्ये
डॉ.गजानन देशमुख
(बालरोग तज्ञ),
डॉ.तजमुल पटेल
(हृदय रोग तज्ञ) ,
डॉ. राजू टोम्पे
(स्त्रीरोग तज्ञ),
डॉ.संजय पोहरे
(कान नाक घसा तज्ञ),
डॉ. अंगरवार संतोष (शल्यचिकित्सक surgen),
डॉ.हणमंते सूर्यकांत
( भूल तज्ञ),
डॉ. महेश पोकले
( दंत शल्यचिकित्सक),
किडनी विकार तज्ञ, मधुमेह तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, दंत विकार तज्ञ, पोट विकार तज्ञ, डोळ्याचे आजार मोतीबिंदू, अपेंडिक्स ,हर्निया ,थायरॉईड, अवयव दान, ब्लड डोनेशन कॅम्प महिलांचे आजार ,अंडवृधी ऑपरेशन ,या मेळाव्यामध्ये सर्व विकार तज्ञ उपस्थित राहणार आहेत

तर सर्व सुजाण नागरिकांनी याचा लाभ घेऊन संधीचं सोनं करून घ्यावे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर सर यांनी कंधार शहरासह तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने भव्य रोग निदान व उपचार शस्त्रक्रिया शिबीर व मेळाव्याचे आयोजन केले आहे.

कंधार शहरासह तालुक्यातील सर्व रुग्णांनी आधार कार्ड, मतदान कार्ड,राशेन कार्डच्या आधारित आजारावरील उपचार व निदान करणार आहेत. या महाआरोग्य मेळाव्यात हेल्थ आय डि. व गोल्ड कार्ड, प्रधान मंत्री कार्ड देण्यात येणार आहेत सर्वरोग निदान शिबिराचा लाभ घेण्यासाठी कंधार शहरासह तालुक्यातील सर्व सुजाण जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कंधार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. आर.लोणीकर सर यांनी कंधार शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

या मेळाव्यासाठी ग्रामीण रुग्णालय कंधार येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *