कंधार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्ताची जवळून संवाद साधून पक्ष संघटना वाढीसाठी २३ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रवादी संवाद यात्रा काढून राज्याच्या सर्व विभागामध्ये पक्षाच्या शेवटच्या कार्यकरणीच्या प्रत्येक कार्यकर्तापर्यंत संपर्क प्रस्तापीत केला आहे.
मा. खा. शरदचंद्रजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सांगता दि. २३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० वा. तपोवन मैदान, कोल्हापूर येथे होणार आहे .
कोल्हापूर येथे होणाऱ्या या राष्ट्रवादी परिवार संवाद संकल्प सभेस कंधार तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी कंधार तालुकाध्यक्ष शिवदास गंगाधरराव पा. विश्वासराव धर्मापुरीकर यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.