शिवा संघटनेची कंधार येथे बैठक संपन्न ; महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी बालाप्रसाद मानसपुरे तर स्वागत अध्यक्षपदी शहाजी नळगे यांची निवड

कंधार

बालाजी मंदिर कंधार येथे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या प्रमुख उपस्थित शनिवार दि२३ एप्रिल रोजी बैठक घेण्यात आली

शिवा संघटनेच्या वतीने कंधार शहरात क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 891 ही जयंती साजरी करण्यासाठी पूर्व नियोजित बैठक बालाजी मंदिर कंधार येथे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दि२३ एप्रिल रोजी घेण्यात आली .

त्या बैठकीमध्ये जयंती समितीचे अध्यक्षपदी बालाप्रसाद मानसपुरे यांची तर स्वागत अध्यक्षपदी शहाजी नळगे यांची निवड करण्यात आली व कार्याध्यक्षपदी माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकूलवाढ यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *