कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठाण पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे 30 एप्रिल रोजी ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार कंधारात वितरण.


कंधार ; प्रतिनिधी

  पत्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मान झाला पाहिजे या उदेशाने कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय ,मराठवाडा स्तरीय व नांदेड जिल्हातील 16 तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देवुन त्यांचा गौरव केला जातो.हा पुरस्कार वितरण सोहळा दि30एप्रिल रोजी सकाळी 10-30 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कंधार येथे होणार आहे.

     कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान कंधारच्या वतिने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देवुन त्यांचा गौरव केला जातो. पुरस्कार 2021 चे मानकरी  छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण राज्यस्तरीय पुरस्कार  लोकशाही न्यूज चे वृत्तनिवेदक ऋषी देसाई (मुंबई ) यांना तर बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भुषण पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे नांदेड जिल्हाप्रतिनीधी कालीदास जहागीरदार (नांदेड ) आणि  दैनिक नांदेड चौफेरचे संपादक पठाण आरेफ खान यांना महात्मा फुले उत्कृष्ठ पत्रकारीता जिल्हास्तरीय पुरस्कारासह जिल्हयातील सोळा तालुक्यातील निवड झालेल्या पत्रकारांना पुरस्कार  वितरीत करण्यात येणार आहे.

संत नामदेव महाराज मंगल कार्यालय बसस्टॅण्ड जवळ कंधार येथे दिनांक 30एप्रिल 2022शनिवारी सकाळी 10-30 वाजता पुरस्कार वितरण सोहळा  सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे असणार असुन प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमरनाथ राजुरकर,आमदार मोहण अण्णा हंबर्डे,आ.जितेश अंतापुरकर,माजी आमदार ईश्वरराव भोसीकर,माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे,मन्याड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार,माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे,काॕग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे यांची उपस्थिती राहणार आहे तर विशेष उपस्थिती म्हणून जेष्ठ पत्रकार संजिव कुलकर्णी ,दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे,पंढरीनाथ बोकारे,रुपेश पाडमुख याची विशेष उपस्थिती राहणार आहे

  

लोकशाही न्यूज चे वृत्तनिवेदक ऋषी देसाई (मुंबई ) हे पत्रकारांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.त्यामुळे या पुरस्कार सोहळाव्याला जिल्ह्यातील ,तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित असे अहवान कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण व हिंदवी बाणा लाईव्हच्या वतिने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *