पत्रकारांनी निःपक्षपातीपणा व स्वाभिमानी बाणा जोपासावा -ना.अशोकराव चव्हाण

कंधार,
सध्याच्या काळात राजकीय क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाल्याने राजकारणातील अस्वस्थता दूर होणे गरजेचे आहे.त्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेनी निःपक्षपातीने काम करून स्वाभिमानी बाणा जपणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कंधार येथील आयोजित पत्रकार पारितोषिक वितरण सोहळयाच्या निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.


कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्हच्या वतीने सन २०२१ च्या पुरस्कार वितरण दि.३० रोजी कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्हच्या वतीने जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १६ पत्रकारांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पुढे बोलतांना पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की,सध्याच्या राजकीय वर्तुळात भयानक अस्वस्थता असून कोणावर कधी उडी लावली जाईल काही सांगता येत नाही.त्यामुळे ही अस्वस्थता थांबवायची असेल तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेमध्ये सध्याच्या काळात किड लागल्यासारखे व पण आहे.लोकशाही मजबुतीकरणासाठी अशी लागलेली किड वेळेवर थांबविणे आवश्यक आहे.


कै.दूर्गादास सराफ व हिंदवी बाणा लाईव्हच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण विकास पत्रकारिता पुरस्कार प्रा.डॉ.गंगाधर तोगरे,लोकमत (कंधार),

लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार सतीश शिंदे पुढारी (धर्माबाद ),साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शोध पत्रकारिता पुरस्कार,अहमद शेख पुढारी (लोहा),
प्रल्हाद केशव अत्रे आदर्श पत्रकारिता पुरस्कार पंडितराव पतंगे पुण्यनगरी (हदगाव ),


प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारिता पुरस्कार, बालाजी पांचाळ देशोन्नती (भोकर), कै. वसंतराव नाईक हरितक्रांती पत्रकारिता पुरस्कार श्री भुषण पारळकर सामना (नायगाव),डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम पत्रकारिता पुरस्कार, साजिद माजिद खान सकाळ ( माहूर ),बाळासाहेब ठाकरे रोखठोक पत्रकारिता पुरस्कार अशीष देशपांडे गोदातीर ( किनवट ),डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार,रामचंद्र भंडरवार देशोन्नती (देगलुर ),


कै.सुधाकरराव डोईफोडे सामाजिक पत्रकारिता पुरस्कार, प्रकाश जैन,सकाळ (हिमायतनगर ),
कै.माधवराव आंबुलगेकर पत्रकारिता पुरस्कार गौतम लंके लोकमत,(कासराळी ता.बिलोली), कै.विलासराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार नामदेव राहीरे उ.मराठवाडा (मुदखेड ),


कै.गोपीनाथराव मुंडे पत्रकारिता पुरस्कार नारायण यम्मेवार,लोकपत्र ( उमरी ),गौरी लंकेश पत्रकारिता पुरस्कार उदयकुमार गोंजकर गावकरी (अर्धापूर ),कै.दुर्गादास सराफ पत्रकारिता पुरस्कार शिवाजी कोनापुरे प्रजावानी ( मुखेड ) कंधार ग्रामिण रुग्णालयाचे वैघकीय अधिक्षक डॉ सुर्यकांत लोणीकर , पेटर विठल मुनगीलवार यांना जाहिर करण्यात आले होते.

कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.हा कार्यक्रम आज संपन्न झाला .

या कार्यक्रमाला संत एकनाथ नामदेव महाराज,प्रा.मनोहर धोंडे,,माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे,ऋषी देसाई, एकनाथ पवार यांची भाषणे झाली.प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार संतोष पांडागळे यांनी केले. व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर माजी आमदार ईश्वरराव भोसीकर,काँग्रेस जिल्हाध्यक्ष नागिलेकर,अरविंद नळगे,एकनाथ मोरे,रुपेश पाडमुख आदिसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी आ.अमरनाथ राजूरकर यांनी एक लाखाचा निधी हिंदवी बाणा यांना घोषित केला.दरवर्षी डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या नावाने पत्रकारिता पुरस्कार या रक्कमेच्या व्याजातून देण्यात येईल असे सांगण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण व हिंदवी बाणा लाईव्ह परीवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *