मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसेना पदाधिकार्‍यांची सात रोजी नांदेडमध्ये बैठक :10 मे रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तर 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर


नांदेड: शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री तथा यूवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या आठवड्यात नांदेड दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने नांदेड जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांची दिनांक 7 मे रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे दुपारी एक वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे , जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी माहिती दिली .


राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे दिनांक 10 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत .या दौर्‍यात वाडी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय इमारत भूमिपूजन आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मा. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तर दिनांक 14 मे रोजी शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते गोदावरी अर्बन बँकेच्या मुख्य शाखेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हेमंत पाटील ,आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार अनुसायाताई खेडकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर , माजी आमदार रोहिदास चव्हाण, सहसंपर्कप्रमुख धोंडू पाटील , भुजंग पाटील, प्रकाश मारावार यांच्या उपस्थितीत दिनांक 7 मे रोजी दुपारी एक वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.


या बैठकीस शिवसेनेचे आजी -माजी पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी ,शिवसेना महिला आघाडीच्या आजी-माजी पदाधिकारी , युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे , जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे ,महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शहर प्रमुख सचिन किसवे, शहर प्रमुख तुळाजेश यादव यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *