पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यामुळेच म.बसवेश्‍वरांच्या पुतळ्याची निर्मिती शिवाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांचा पुनर्रउच्चार


नांदेड – ज्यांची काम केले त्यांना श्रेय देण्याची शिवा संघटनेची पुर्वीपासून भूमिका राहिली आहे. नांदेडमध्ये महात्मा बसवेश्‍वर यांचा अश्‍वारुढ पुतळा उभारल्या जावा अशी वीरशैव बांधवांची मागणी होती. या मागणीची पुर्तता खऱ्या अर्थाने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनीच केली असून नांदेडमधील जगद्ज्योती म.बसवेश्‍वर यांच्या पुतळा निर्मितीचे तेच खरे शिल्पकार असल्याचा पुनर्रउच्चार शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी केला आहे.


शिवा संघटनेच्यावतीने जगद्ज्योती महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त प.पू.बेटमोगरेकर महाराज व प.पू.तमलूरकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन कौठा भागातील महात्मा बसवेश्‍वर यांच्या पुतळ्यासमोर आयोजित केलेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. उद्घाटक म्हणून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर आ.मोहनअण्णा हंबर्डे, महापौर सौ.जयश्रीताई पावडे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जि.प.च्या माजी सदस्या डॉ.मिनलताई खतगावकर, माजी सभापती स.विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिवाचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर, उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष पांडागळे, स्वागताध्यक्ष संजय बेळगे, कार्याध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, शिवाचे संपर्क प्रमुख अनिल माळगे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे,राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबिडे, नगरसेवक आनंद चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, ॲड.निलेश पावडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन बारसे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, शिक्षक नेते मधुकर उन्हाळे, शिवा कांबळे, माधवराव पटणे, संतोष मोरे, प्रभाकरराव उदगीरे, मन्मथ डांगे, माधव कंधारे आदींची उपस्थिती होती.


यावेळी बोलतांना प्रा.धोंडे म्हणाले की, 2004 साली सर्वप्रथम शिवा संघटनेने म.बसवेश्‍वर पुतळ्याची मागणी केली. जागेची अडचण, सर्वोच्च न्यायालयाच्या पुतळानिर्मिती संदर्भात घातलेल्या अटी यामुळे थोडा वेळ लागला, परंतु शेवट गोड झाला. या पुतळानिर्मितीसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना पुतळानिर्मितीसाठी अनेकदा सूचना केल्या. केवळ पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या विषयात लक्ष घातल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात चांगला व मोठा पुतळा नांदेडमध्ये बसल्याचा आपणास अभिमान असून यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण कौतूकास पात्र असल्याचे ते यावेळी म्हणाले.


ओबीसीचे आरक्षण कुणी घालविले याचे चिंतन करा – आ.राजूरकर
यावर्षीची जगद्ज्योती म.बसवेश्‍वर यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. यावर्षीचा उत्साह ही तर झाँकी आहे पुढे बघत रहा आणखी बरेच काही बाकी आहे असे सांगत म.बसवेश्‍वरांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. या पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी पोलिस बंदोबस्तात आपण आलो होतो. याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. एका बाजूस लिंगायत समाजातील विविध पोटजातींना ओबीसीच्या सवलती मिळविण्यासाठी 2013 मध्ये श्री केदार जगद्गुरु यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्याला यशही आले परंतु आता संपूर्ण ओबीसीचे आरक्षणच घालविण्याचे पाप करण्यात आले आहे. हे आरक्षण कुणी घालविले याचे चिंतन करण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केले.


आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा – पांडागळे
पुतळा निर्मितीचे स्वप्न पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यामुळे सत्यात उतरले आहे. याचा आनंद सर्वच बसवप्रेमींना आहे. पुतळा बसविला गेला ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. परंतु यासोबतच लिंगायत समाजातील युवक, युवतींना रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी म.बसवेश्‍वर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी म.बसवेश्‍वर उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी यावेळी केली.


यावेळी आ.मोहनअण्णा हंबर्डे, महापौर सौ.जयश्रीताई पावडे, डॉ.मिनलताई खतगावकर, बालाजी पांडागळे, वैजनाथ तोनसुरे, विठ्ठल ताकबिडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोठाळे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून आलेल्या शिवा संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील बुढे, दिगंबर मांजरमकर, वीरभद्र बसापुरे, शंकर पत्रे, नंदूअप्पा देवणे, जी.एस.मंगनाळे, बी.जी.फसमले, रामकिशन पालिमकर, राम भातांब्रे, एस.डी.पावडे, सिध्देश्‍वर स्वामी, शुभम घाडके, सत्यभामा येजगे, नंदताई पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी कौठ्यातील नागरिकांच्यावतीने शंकर स्वामी शेवडीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *