विमा सल्लागार पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता व मापदंड
उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत-कमी 18 वर्षं व जास्तीत-जास्त 50 वर्ष दरम्यान असावे.अर्जदार हा दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ज्यात केंद्रीय / राज्य मान्यता प्राप्त केलेली असावी. बेरोजगार/ स्वयंबेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य आदी टपाल जीवन विमासाठी थेट असे अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती आदी बाबी अपेक्षित आहेत. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी / केव्हीपीच्या स्वरूपात असेल.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे नांदेड विभाग डाकघरचे अधिक्षक यांनी कळविले आहे.