कंधार ; प्रतिनिधी
आज गुरुवार दि. २ जुन रोजी ११ वाजुन ७ मिनीटे यावेळेत माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी कामा निमित्य पंचायत समिती कार्यालयात गेले होते.
नुकताच जनता दरबारामध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आज दि. 2 जुन रोजी बालाजी चुकलवाड गेले असता त्यांना त्यांना पंचायत समिती कंधार मधे ऐक ही अधिकारी आणि ९० टक्केकर्मचारी टेबलावर उपस्थित नसल्याची माहिती दिली व सदर कार्यालयाच्या रिकाम्या खुर्ची चा फोटो सोशल मिडीयावर व्हॉयरल करून
सदरील कर्मचारी सरकारच्या पगारी घेऊन मज्जा मारत आहेत प्रशासनामे तात्काळ या गंभीर बाबीची दखल घेवून पंचायत समिती कंधार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी थांबवावे असे आवाहन सोशल मिडीया द्वारे माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांनी आवाहन केले आहे