शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जागर जनतेचा पोरखेळ भाजपा नेतृत्वाचा या अभियानात ते हदगाव आणि किनवट येथे बोलत होते.
यावेळी खा.हेमंत पाटील, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, धोंडू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना लक्ष्मण वडले म्हणले की, केंद्रातील भाजप सरकारने देशातील जनतेला दाखविलेली स्वप्ने धुळीस मिळवली आहेत. अच्छे दिनाच्या स्वप्न हवेत विरले असतानाच दर वर्षी देशातील दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासनही मोदी सरकारने पाळले नाही. उलट असंख्य युवकांच्या नोकऱ्या गेल्याने बेकरीत वाढ झाली आहे. सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने केवळ फोडा आणि झोडा नीतीचा वापर करत देशातील सामाजिक शांतता धुळीस मिळवण्याचा कट घातला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महागाई गागणला भिडली आहे. इंधाचे दर दहा पटीने वाढवून इंधन दरात अल्प कपात करून पुन्हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येत असल्याने आणि अनेक राज्यात भाजपला विरोध होत असल्याने विरोधकांचा आवाज दाबण्याचा केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैर वापर केला जात आहे . भाजप सरकारने देशात जातीय दंगली घडविण्यासाठी षडयंत्र रचले आहेत. त्याचाच भाग म्हणून अनेक राज्यात धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहेत. त्यामुळे भाजपला देशातील जनता वातागली आहे. भाजपा विरोधी वातावरण तयार करून केंद्र सरकारचा ढोंगी चेहरा जनतेसमोर आना असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना उपनेते लक्ष्मणजी वडले, उदघाटक संपर्क प्रमुख आनंद जाधव, मार्गदर्शक खा हेमंत पाटील, प्रमुख उपस्थिती माजी आ नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हासमन्वयक धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, प्रभाकर देशमुख, बळीराम देवकत्ते, सुभाष जाधव, रामराव चव्हाण, राम ठाकरे, भगवान पाथरडकर, ढोले बापू साहेबराव, शेषेराव पाटील डॉ निळे, डॉ संजय पवार, गणेश तोष्णीवाल, शंकरराव दिलीप बास्टेवाड, बालाजी हरसदकर, ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश देशमुख दिपक मुधोळकर किशोर भोसीकर, अरविंद जाधव, श्रीराम माने, संतोष फुलेवाड, सुभाष शैलेवाड, प्रकाश भदेवाड, बालाजी करेवाड, अजय देवसरकर, आशिश देवसरकर, पंजाब तावडे, काकासाहेब देशमुख, भागवत शिंदे, बाळू महाराज, संभाज सुर्यवंशी बंडू पाटील अशोकराव कदम, अमोल कदम, संदेश पाटील, गजानन गंगासागर, अवधुत देवसरकार, सोनू चंदेल नारायण आमदेरे, सदाशिव आमरते, नंदकुमार सोमरथकर पांडूरंग पाटील, शिवाजी तवर, वैजनाथ पाटील, पंजाबराव शिंदे, शशिकांत सरोदे, अतूल काळे, शशिकांत अमृते, सचिन नाईक बालाजी मुरकूटे, सुदर्शन नाईक, नाना लाड, सुनिल पाटील, जनाबाई डुडूळे, सुरज सातूरवार, संतोष येचलवार, निर्धार जाधव, उमेश जाधव, यश खराटे, प्रमोद केंद्रे, मारोती सुंकलवाड, अविनाश चव्हाण, गजानन कोल्हे, राम बुळे, भगवान राठोड, ललीता दुसावार, किनवट माहूर विधानसभेचे शिवसेना आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .