कंधार : हनमंत मुसळे
विसावा पँलेस नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक मराठवाडा प्रमुख प्रा. विष्णू गोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या कार्यक्रमात कंधार तालुका अध्यक्षपदी संजय विठ्ठलराव जायभाये यांची निवड करुन त्याना नियुक्ती पञ प्रा. विष्णू गोरे (मराठवाडा प्रमुख), गोविंद शुरनर (राष्ट्रीय संघटक), डाँ. बाबुराव श्रीरामे (मराठवाडा मार्गदर्शक ), बोडके (जिल्हाध्यक्ष) आदि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी संजय विठ्ठलराव जायभाये म्हणाले कि, पक्षने माझ्यावर एका तालुक्याची जवाबदारी टाकली आहे. ती मी पुर्ण ताकतीनीशी पार पाडेल येणाऱ्या जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगर परिषद कंधार आदि निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत पक्षाने जे उमेदवार देतील त्यांना निवडुण आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. व दीन-दलित, उपेक्षित, शेतमजुर, शेतकरी, कष्टकरी व सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीन. पक्षाच्या आदेशाचे पालन करुन पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करुन पक्षाला निराश करणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे विचार तळा गळात पोहचुन पक्षाला नव संजिवनी देणार आहे.
या निवडी बदल संजय जायभाये यांचे बि. एस. मुंडे, डाँ. दिनकर जायभाये,काशीनाथ फुले, सचिन मोरे, अँड. राहुल ढवळे, अशोक गुट्टे, हाणमंत मुसळे, वैभव कापरतवार, मनोहर भायगावे, शिवाजी गुरसुडकर, शेख फारुख, गंगाधर किडे, परशुराम केंद्रे केरबा कदम, मधुकर शेंडगे, नामदेव गित्ते, बाळु कागणे आदिनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.