श्री संतकृपा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विजय पवार यांचा काव्य संग्रह प्रकाशित


कराड ; प्रतिनिधी
श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव, ता. कराड जि. सातारा या महाविद्यालयात बी फार्मसी द्वितीय वर्षात शिकत असलेला विद्यार्थी विजय गोविंद पवार या नवोदित कवीच्या निवडक कवितां इंद्रधनु या काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट झाल्या आहेत. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना म्हणाले, औषधनिर्माण शास्त्र आणि कविता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण या क्षेत्रात ही आपण कमी नाही हेच विजय ने दाखवून दिले आहे. विजयच्या या काव्य साहित्य प्रयत्नांना महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती


संस्थेच्या अध्यक्षा डॉ उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्य विजयानंद अरलेलीमठ, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *